भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११२ :
भागीदार, जमीनमालक, भाडेकरू , मालक, एजंट यांचे संबंधाबाबत शाबितीची जबाबदारी :
जेव्हा व्यक्ती म्हणजे भागीदार आहेत की काय, अगर जमीनमालक व भाडेकरू किंवा प्रकर्ता व अभिकर्ता आहेत की काय असा प्रश्न असतो व त्या तशा नात्याने वागत आल्या आहेत असे दाखवून देण्यात आलेले असते तेव्हा, त्यांच्यामध्ये ते ते नाते नाही किंवा ते संपुष्टात आलेले आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी तसे म्हणणाऱ्या व्यक्तीवर असते.