भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १११ :
सात वर्षे ठावठिकाणा कळलेला नाही ती व्यक्ती हयात आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी :
जेव्हा एखादा माणूस हयात आहे की मृत आहे हा प्रश्न असतो व जर तो हयात असता तर स्वाभाविकपणे ज्यांना त्याचा ठावठिकाणा कळला असात त्यांना सात वर्षे त्याच्याबद्दल काही बातमी कळलेली नसते तेव्हा, तो हयात आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी तसे म्हणणाऱ्या व्यक्तीकडे संक्रामित होतो.