Bsa कलम १०५ : शाबितीची जबाबदारी कोणावर असते :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १०५ :
शाबितीची जबाबदारी कोणावर असते :
दाव्यात किंवा कार्यवाहीत जर कोणत्याही बाजूने काहीच पुरावा दिला गेला नाही, तर जी व्यक्ती हरेल तिच्यावर शाबितीची जबाबदारी असते.
उदाहरणे :
(a) क) जी जमीन (बी) च्या कब्जात असून (ऐ) च्या प्रपादनांप्रमाणे (बी) चा बाप (सी) याच्या मृत्युपत्रान्वये (ऐ) ला देण्यात आली होती तिच्यासाठी (ऐ) हा (बी) विरुद्ध दावा लावतो. जर कोणत्याही बाजूने काहीच पुरावा दिला गेला नाही तर, (बी) आपल्याकडे कब्जा ठेवून घेण्यास हक्कदार होईल. म्हणून शाबितीची जबाबदारी (ऐ) वर आहे.
(b) ख) बंधपत्रावरुन येणे असलेल्या पैशासाठी (ऐ) हा (बी) वर दावा लावतो. बंधपत्राचे निष्पादन झाल्याचे कबूल करण्यात आले आहे, पण ते कपटाने मिळवले असे (बी) म्हणतो व (ऐ) ते नाकबूल करतो. जर कोणत्याही बाजूने काहीच पुरावा दिला गेला नाही तर (ऐ) qजकेल, कारण बंधपत्राबद्दल तंटा नाही व कपट शाबीत झालेली नाही. म्हणून शाबितीची जबाबदारी (बी) वर आहे.

Leave a Reply