भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १०१ :
दर्वाच्य, लिखित चिन्हे, वगैरेच्या अर्थाबाबत पुरावा :
वाचता न येण्यासारख्या व सर्वसामान्यपणे सुबोध नसलेल्या लिखित चिन्हांचा, परक्या, लुप्त, पारिभाषिक, स्तानिक व प्रांतीय शब्दप्रयोगांचा, संक्षेपाक्षारांचा व विशिष्ट अर्थाने वापरलेल्या शब्दांचा अर्थ दाखवून देण्यासाठी पुरावा देता येइल.
उदाहरण :
(ऐ) हा शिल्पकार आपली सर्व मॉडेल्स (बी) ला विकण्याचा करार करतो. (ऐ) कडे मॉडेल्स व मॉहेलिंगची हत्यारे ही दोन्ही आहेत. काय विकण्याचे अभिप्रेत होते ते दाखवून देण्यासाठी पुरावा देता येईल.