भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ४० :
तज्ज्ञांच्या मतांशी संबंधित तथ्ये :
तज्ज्ञांची मते संबद्ध असताना एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये जर अशा मतांना पुष्टी देत असतील किंवा त्यांच्याशी विसंगत असतील तर, ती तथ्ये संबद्ध असतात.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) ला विवक्षित विषाची बाधा झाली होती किवा काय हा प्रश्न आहे. त्या विषाची बाधा झालेल्या अन्य व्यक्तींच्या ठिकाणी जी विवक्षित लक्षणे दिसून आली ती त्या विषबाधेची लक्षणे असल्याचे तज्ञांनी प्रतिपादन केले किवा नाकारले हे तथ्य संबद्ध आहे.
(b) ख) बंदराला होणारा अडथळा समुद्रभिंतीमुळे उद्भवला आहे किंवा काय हा प्रश्न आहे. इतर बाबतीत तशाच प्रकारे बसलेली जी इतर बंदरे आहेत, पण जेथे अशा समुद्रभिंती नाहीत त्यांना त्याच सुमारास अडथळा होऊ लागला हे तथ्य संबद्ध आहे.