भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३२ :
व्यवसायक्रमातील निवेदने :
१) कोणत्याही वकिलाशी, असा वकील म्हणून त्याची सेवा चालू असताना त्या काळात आणि त्या प्रयोजनातर्थ त्याच्या अशिलाने किंवा अशिलाच्या वतीने केलेले कोणतेही निवेदन प्रकट करण्यास अथवा आपल्या व्यावसायिक नेमणुकीच्या काळात आणि त्या प्रयोजनासाठी त्याला ज्या कोणत्याही दस्तऐवजाची माहिती करून घ्यावी लागली असेल त्याचा मजकूर किंवा शर्त सांगण्यास अथवा अशा सेवेच्या काळात व त्या प्रयोजनासाठी त्याने आपल्या अशिलाला दिलेला कोणताही सल्ला प्रकट करण्यास त्याला त्याच्या अशिलाच्या स्पष्ट संमतीशिवाय परवानगी दिली जाणार नाही :
परंतु, या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे.
(a) क) कोणत्याही अवैध प्रयोजनाच्या पुर:सरणार्थ केलेले असे कोणतेही निवेदन;
(b) ख) आपली नेमणूक सुरू झाल्यानंतरच्या मुदतीत एखादा गुन्हा किंवा कपट करण्यात आल्याचे दर्शक असे जे कोणतेही तथ्य कोणत्याही वकिलाच्या निदर्शनाला आले असेल ते तथ्य,
यांना प्रकटनावरील बंधानाचे संरक्षण मिळणार नाही.
२) अशा तथ्याकडे पोटकलम (१) च्या परंतुकामध्ये निर्दिष्ट वकिलाचे लक्ष त्याच्या अशिलाकरवी किंवा त्याच्या वतीने वेधलेले होते किंवा नाही हे गौण आहे.
स्पष्टीकरण :
या कलमात सांगितलेले बंधन वृत्तिक (प्रोफेशनल) सेवा संपल्यानंतरही चालू राहते.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) हा अशील (बी) या वकीलाला म्हणतो – मी बनावट दस्तऐवज केला आहे व तुम्ही माझा बचाव करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. दोषी असल्याचे माहीत असलेल्या माणसाचा बचाव हे गुन्हेगारी प्रयोजन नसल्यामुळे या निवेदानाला प्रकटनावरील बंधनाचे संरक्षण आहे.
(b) ख) (ऐ) हा अशील (बी) या वकीलाला म्हणतो – एका बनावट विलेखाचा वापर करुन मालमत्तेचा कब्जा घेण्याची माझी इच्छा आहे व त्या विलेखावरुन दावा लावण्याची मी तुम्हाला विनंती करतो. गुन्हेगारी प्रयोजनाच्या पुर:सरणार्थ हे निवेदन केले गेल्यामुळे, त्याला प्रकटनावरील बंधनाचे संरक्षण नाही.
(c) ग) (ऐ) वर अफरातफरीचा दोषारोप असून तो आपला बचाव करण्यासाठी (बी) या वकीलाला नेमतो. कार्यवाहीच्या ओघात (बी) च्या असे नजरेस येते की, (ऐ) ने तथाकथित अफरातफर केलेली रक्कम (ऐ) कडून येणे असल्याचे दाखवणारी नोंद (ऐ) च्या हिशेबवहीत करण्यात आली आहे व ती नोंद त्याच्या वृत्तिक (प्रोफेशनल) सेवेच्या प्रारंभी त्या वहीत नव्हती. कार्यवाही सुरु झाल्यानंतर कपट करण्यात आले आहे असे दाखवणारे हे तथ्य स्वत:च्या सेवेच्या अवधीत (ऐ) च्या नजरेस आल्यामुळे, त्याला प्रकटनावरील बंधनाचे संरक्षण नाही.
३) या कलमाच्या तरतुदी दुभाषी आणि लिपिक किंवा वकिलांच्या कर्मचाèयांना लागू होतील.