Bsa कलम १०२ : दस्तऐवजांच्या अटी बदलणारा आधीचा करार कोण दाखवू शकतात :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १०२ :
दस्तऐवजांच्या अटी बदलणारा आधीचा करार कोण दाखवू शकतात :
ज्या व्यक्ती दस्तऐवजातील पक्ष नाहीत किंव त्यांचे हितसंबंध-प्रतिनिधी नाहीत त्यांना दस्तऐवजाचे अटी बदलणारा समकालीन करार झाला होता हे दाखवून देण्यास उपयुक्त अशा कोणत्याही तथ्यांचा पुरावा देता येईल.
उदाहरण :
(बी) ने (ऐ) ला विवक्षित कापूस विकावा आणि सुपूर्दगी झाली की पैसे देण्यात यावेत असा (ऐ) व (बी) लेखी करार करतात. याचवेळी (ऐ) ला तीन महिन्यांची उधारी द्यावी असा तोंडी करार ते करतात. (ऐ) व (बी) यांच्या दरम्यान हे दाखवून देता येणार नाही.पण त्यामुळे (सी) च्या हितसंबंधावर परिणाम झाला असेल तर (सी) ते दाखवू शकेल.

Leave a Reply