महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९ :
१.(पोलीस प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांची नेमणूक:
१) राज्य शासनाला, अधीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल अशा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा किंवा राज्य शासनाने स्थापन केलेल्या इतर कोणत्याही पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून नेमता येईल. राज्य शासनाला, त्यास योग्य वाटतील अशा शक्ती, अशी कामे व कर्तव्ये अशा रीतीने नियुक्त केलेल्या प्राचार्यांपैकी प्रत्येक प्राचार्याकडे सोपवून देता येतील.
२) राज्य शासनाला, सहायक अधीक्षकाच्या किंवा उप अधीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल अशा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास राज्य शासनाने स्थापन केलेल्या कोणत्याही पोलीस प्रशिक्षण शाळेचा प्राचार्य म्हणून नेमता येईल. राज्य शासनाने त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या ((उप महानिरीक्षकाच्या) दर्जाहून कमी दर्जा नसेल अशा) अधिकाऱ्यास, राज्य शासनाच्या नियंत्रणास अधीन राहून, त्यास योग्य वाटतील अशी शक्ती, अशी कामे व कर्तव्ये अशा रीतीने नियुक्त केलेल्या प्रत्येक प्राचार्याकडे सोपवून देता येतील.)
——–
१. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ३ अन्वये कलम ९ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.