Bp act कलम ९८ : निकडीच्या प्रसंगी पोलिसंची कर्तव्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९८ :
निकडीच्या प्रसंगी पोलिसंची कर्तव्ये :
१) राज्य शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेली कोणतीही सेवा समाजास आवश्यक अशी सेवा म्हणून जाहीर करता येईल.
परंतु असे की, अशी अधिसूचना, प्रथमत: एक महिन्यासाठी अमलात राहील, परंतु तिची मुदत, वेळोवेळी तशाच अधिसूचनेद्वारे वाढविण्यात येईल.
२) पोट-कलम (१) अन्वये घोषणा केल्यानंतर आणि जोपर्यंत ती अमलात असेल तोपर्यंत, प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने, घोषणेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सेवेवर रुजू होण्याच्या संबंधात किंवा सेवेच्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेला कोणताही आदेश पाळणे हे त्याचे कर्तव्य असेल आणि असा प्रत्येक आदेश हा, ह्या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता व त्याच्या अर्थानुसार विधिसंमत आदेश आहे असे समजण्यात येईल.

Leave a Reply