Bp act कलम ९७ : वरिष्ट दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांना कनिष्ठाकडे सोपविलेली कर्तव्ये करता येतात:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९७ :
वरिष्ट दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांना कनिष्ठाकडे सोपविलेली कर्तव्ये करता येतात:
पोलीसशिपायाच्या दर्जाहून वरच्या दर्जाच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, आपल्या हाताखालीस कोणत्याही अधिकाऱ्यास विधिद्वारे किंवा विधिपूर्ण आदेशाद्वारे नेमून दिलेले कोणतेही कर्तव्य करता येईल आणि अशा हाताखालच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आलेल्या कोणत्याही कर्तव्याच्या बाबतीत, वरिष्ठ अधिकाऱ्यास, त्यास आवश्यक वाटेल तेथे कामाच्या बाबतीत, विधिची पूर्णपणे किंवा अधिक सुलभरीत्या अमंलबजावणी व्हावी किंवा त्याचे उल्लंघन होउ नये म्हणून त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याच्या कामात मदत करता येईल. त्यात भर घालता येईल. ते रद्द करता येईल किंवा अशा हाताखालच्या व्यक्तीच्या कोणत्याही कार्यवाहीस स्वत:च्या किंवा त्याच्या आज्ञेनुसार किंवा त्याच्या प्राधिकारान्वये वैध कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यवाहीने प्रतिबंध करता येईल.

Leave a Reply