महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९४ :
अधिसूचनेद्वारे दर ठरविणे :
१) कोंडवाड्याबद्दल आकारावयाची फी ही, राज्य शासन जनावराच्या प्रत्येक जातीसाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे १.(***) वेळोवेळी विनिर्दिष्ट करील त्याप्रमाणे असेल.
२) आकारण्यात येणारा खर्च हा, जनावराला ज्या दिवसाच्या कोणत्याही भागामध्ये कोंडवाड्यात ठेवले असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल, आयुक्त २.(***) अशा जनावराच्या संबंधात वेळोवेळी ठरवील त्याप्रमाणे असेल.
——–
१. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १३ (१) अन्वये संबंध राज्यासाठी अथवा या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा प्रवेशासाठी हा मजकूर वगळण्यात आला.
२. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १३ (२) अन्वये अथवा वर सांगितल्याप्रमाणे नेमण्यात आलेला कोणताही अधिकारी हा मजकूर वगळण्यात आला.