Bp act कलम ९२ : हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९२ :
हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे:
कलम ९१ अन्वये कोंडवाड्यात घातलेल्या गुरांच्या मालकाने किंवा त्याच्या अभिकत्र्याने हजर होऊन त्या गुरांवर हक्क सांगितला तर कोंडवाड्याच्या रक्षक अशा गुरांच्या संबंधाने कलम ९४ अन्वये आकारण्याजोगी कोंडवाड्याबद्दलची फी व खर्च देण्यात आल्यावर, ती त्याच्या स्वाधीन करील.

Leave a Reply