महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९१ :
गुरांस कोंडवाड्यात घालणे :
जी कोणतीही गुरे १.(आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या २.(बृहन्मुंबई व्यतिरिक्त) कोणत्याही क्षेत्रात) ३.(***) कोणत्याही रस्त्यावर भटकताना किंवा त्यातील कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करताना आढळतील ती गुरे धरुन अशा कोणत्याही सार्वजनिक कोंडवाड्यात घालण्याकरिता तिकडे नेणे हे प्रत्ये पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल व इतर कोणत्याही व्यक्तीने तसे करणे हे विधिसमंत असेल.
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईत या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनिय क्रमांक १८ याच्या कलम ७ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
३. सन १९५३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० याच्या कलम ११ अन्वये हा मजकुर वगळण्यात आला.