Bp act कलम ९० : गुरांचे कोंडवाडे उघडण्याचे व कोंडवाड्याचे रक्षक नेमण्याचे अधिकार :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९० :
गुरांचे कोंडवाडे उघडण्याचे व कोंडवाड्याचे रक्षक नेमण्याचे अधिकार :
१) १.(आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या २.(बृहन्मुंबई व्यतिरिक्त) कोणत्याही क्षेत्रात ) आयुक्त ३.(***) वेळोवेळी त्यास योग्य वाटतील अशा जागा सार्वजनिक कोंडवाड्यांसाठी नेमून देईल: व त्यास राज्य शासन संमत करील अशा दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना अशा कोंडवाड्यांचे रक्षक म्हणून नेमता येईल.
२) अशा रीतीने नियुक्त केलेला प्रत्येक कोंडवाडा रक्षक आपली कर्तव्य करीत असताना, आयुक्ताच्या ४.(***) निदेशाच्या व नियंत्रणाच्या अधीन असेल.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबई या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमाकं १८ याच्या कलम ५ व ६ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
३. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम ९ अन्वये आणि राज्य सरकार सरकारी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करुन या कलमाचे उपबंध व या अधिनियमाची कलमे ९१, ९२, ९३ व ९४ यांचे उपबंध ज्या क्षेत्रांना लागू करील अशा इतर क्षेत्रात राज्य सरकारने त्याबाबतीत नेमलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने हा मजकुर वगळण्यात आला.
४. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम ९ अन्वये अथवा उपनिर्दिष्ट अशा अधिकाऱ्याचा हा मजकुर वगळण्यात आला.

Leave a Reply