महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९०-अ :
१.(गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करु देणे यासाठीची शिक्षा:
१) २.(आयुक्ताच्या प्रभाराखालील ३.(बृहन्मुंबई व्यतिरिक्त ) कोणत्याही क्षेत्रातील) कोणतीही व्यक्ती जी गुरेढोरे तिच्या मालकीची किंवा तिच्य ताब्यात आहेत अशा कोणत्याही गुराढोरांना कोणत्याही रस्त्यावर भटकू देईल किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करु देईल तर, अशा व्यक्तीस-
(एक) पहिल्या अपराधाबद्दल एक महिन्यापर्यंत असू शकेल एवढ्या कैदेची शिक्षा किंवा ४.(तीन हजार रुपयांपर्यंत) असू शकेल एवढ्या दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील;
(दोन) दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल, सहा महिनेपर्यंत असू शकेल एवढ्या कैदेची शिक्षा किंवा ५.(पाच हजार रुपयांपर्यंत) दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
२) पोट-कलम (१) अन्वये खटला चालविणाऱ्या दंडाधिकाऱ्यास खालील आदेश देता येतील :-
(अ) आरोपी, त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या गुराढोरांनी ज्या व्यक्तीच्या जमिनीवर अपप्रवेश केल्यामुळे तिच्या मालमत्तेस किंवा जमिनीच्या उत्पन्नास कोणतेही नुकसान झाल्याचे सिद्ध झाले आहे अशा कोणत्याही व्यक्तीस, दंडाधिकाऱ्यास, वाजवी वाटेल अशी ६.(दोन हजार रुपयांहून अधिक) नसणारी भरपाई देईल; आणि तसेच
(ब) ज्या गुराढोरांच्या बाबतीत अपराध घडला आहे अशी गुरेढोरे राज्य शासनाकडे जमा करील; असा आदेश देता येईल.
३) पोट-कलम (२) अन्वये मंजूर केलेली कोणतीही नुकसानभरपाई, जणू उक्त कलमान्वये लादण्यात आलेला दंड आह असे समजून वसूल करण्यात येईल.
४) ह्या कलमाखालील अपराध संज्ञेय (दखलपात्र) असेल.
———
१. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या १० अन्वये कलम ९०अ समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईत या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनिय क्रमांक १८ याच्या अनुक्रमे ५ व ६ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
४. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १३ (अ) (एक) अन्वये तीनशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
५. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १३ (अ) (दोन) अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
६. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १३ (अ) (तीन) अन्वये दोनशे पन्नास रुपयांहून अधिक या मजकुराऐवजी समाविष्ट केले.