महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८९ :
पोलिसांना मोकाट गुरे ताब्यात घेता येतील :
१.(आयुक्ताच्या प्रभाराबाहेरील कोणत्याही क्षेत्रात) पोलीस अधिकाऱ्यास पशु (गुरे) अतिचार (अपप्रवेश) अधिनियम, १८७१ याच्या उपबंधाच्या २.(३.(***) किंवा हैदाबाद पशु अतिचार अधिनियम) याच्या कक्षेत येणारा जे कोणतेही प्राणी रस्त्यावर भटकताना आढळून येईल तो ताब्यात घेता येईल आणि जवळच्या कोंडवाड्यात घेऊन जाता येईल किंवा पाठविता येईल आणि त्यानंतर त्या जनावराच्या मालकास व इतर संबंधित व्यक्तींना ४.(संबंधित अधिनियमाचे) उपबंध लागू होतील.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईबाहेरीाल कोणत्याही प्रदेशात या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम २९ (१) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
३. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये किंवा मुंबई राज्याच्या सौराष्ट्र प्रदेशात अंमलात असलेल्या अधिनियमाच्या हा मजकूर वगळण्यात आला.
४. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम २९ (२) अन्वये उक्त अधिनियमाचे या मजकुराऐवजी हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.