Bp act कलम ८८ : भारतीय उत्तराधिकार अधिनियम किंवा महाप्रशासक अधिनियम किंवा सन १८२७ चा विनिमय ८ १.(किंवा तत्सम कायदा) यामुळे कार्यपद्धतीस बाध न येणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८८ :
भारतीय उत्तराधिकार अधिनियम किंवा महाप्रशासक अधिनियम किंवा सन १८२७ चा विनिमय ८ १.(किंवा तत्सम कायदा) यामुळे कार्यपद्धतीस बाध न येणे :
भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ किंवा महाप्रशासक अधिनियम १९१३ या मधील कोणताही मजकूर कलम ८५ च्या पोट-कलम (१) अन्वये आयुक्ताने जिची व्यवस्था केली आहे अशा विनामृत्युपत्र मालमत्तेस लागू होणार नाही; तसेच सन १८२७ चा विनियम ८, कलम १० च्या २.(किंवा अमलात असलेल्या कोणत्याही तत्सम विधीचे) उपबंध, कलम ८५ च्या पोट-कलम (१) अन्वये दंडाधिकाऱ्याने जिची व्यवस्था केली आहे अशा विनामृत्युपत्र मालमत्तेस लागू होतात असे समजण्यात येणार नाही.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम २८ (२) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम २८ (१) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply