महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८७ :
मालमत्तेवर कोणी दावा (हक्क) न सांगितल्यास ती राज्यशासनाच्या स्वाधीन असणे :
उद्घोषणात विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीच्या आत कोणत्याही व्यक्तीने अशा मालमत्तेवर आपला हक्क प्रस्थापित केला नाही तर ती राज्य शासनाच्या स्वाधीन होईल व ती मालमत्ता किंवा कलम ८५ च्या पोट-कलम (२) अन्वये न विकलेला तिचा भाग, यथास्थिती संबंधित आयुक्ताच्या १.(किंवा अधिक्षकाच्या) किंवा दंडाधिकाऱ्याच्या आदेशान्वये लिलावाने विकता येईल.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १२ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.