Bp act कलम ८६ : मालमत्ता, तिच्यावर हक्क असलेल्या व्यक्तीच्या स्वाधीन करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८६ :
मालमत्ता, तिच्यावर हक्क असलेल्या व्यक्तीच्या स्वाधीन करणे :
१) यथास्थिती, संबंधित आयुक्त १.(किंवा अधीक्षक) किंवा दंडाधिकारी कलम ८५ च्या पोट-कलम (१) अन्वये काढलेल्या उद्घोषणपत्रात विनिर्दिष्ट केलेल्या मालमत्तेच्या कब्जाबाबत किंवा वहिवाटीबाबत दावा सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या हक्काबद्दल त्याची खात्री झाल्यानंतर, ती ताब्यात घेण्यासाठी किंवा अटकावून ठेवण्यासाठी पोलिसास योग्य रीतीने आलेला खर्च वजा करुन किंवा तो देण्यता आल्यानंतर ती त्या दावा सांगणाऱ्या स्वाधीन करावी असा आदेश देईल.
तारण घेण्याची शक्ती :
२) यथास्थिती, संबंधित आयुक्त १.(किंवा अधीक्षक) किंवा दंडाधिकारी यास, स्वेच्छानिर्णयानुसार पोट-कलम (१) अन्वये कोणताही आदेश देण्यापूर्वी, उक्त मालमत्ता ज्या व्यक्तीच्या स्वाधीन करावयाची असेल त्या व्यक्तीकडून त्यास योग्य वाटेल असे तारण घेता येईल आणि असा आदेशान्वये ती मालमत्ता ज्या व्यक्तीच्या स्वाधीन केली असेल त्या व्यक्तीकडून ती सबंध मालमत्ता किंवा तिचा कोणताही भाग घेण्याबद्दलच्या कोणत्याही व्यक्तीच्या हक्कास, यात यापूर्वी असलेल्या कोणत्याही मजकुरामुळे बाध येणार नाही.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ११ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply