महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८४ :
चारशे रुपयांहून अधिक किमतीची विनामृत्युपत्र मालमत्ता :
कलम ८३ अन्वये किंवा मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७ याच्या १.(किंवा मुंबई राज्याच्या कच्छ प्रदेशात अमलात असलेल्या त्या अधिनियमाच्या कलम १९ अन्वये किंवा सौराष्ट्र ग्राम पोलीस अध्यादेश, १९४९ याच्या कलम २१ अन्वये) ज्या मालमत्तेसंबंधी दंडाधिकाऱ्याकडे प्रतिवृत्त पाठविण्यात आले ती मालमत्ता मृत्युपत्र न करता मरण पावलेल्या आणि जिचे वारस माहीत नाहीत अशा व्यक्तीची असून ती जाहीर लिलावात विकल्यास तिचे चारशे रुपयांहून अधिक ठोक उत्पन्न येण्याचा संभव आहे असे जर दंडाधिकाऱ्यास आढळून येईल तर तो सन १८२७ चा मुंबई विनियम ८ च्या कलम १० च्या उपबंधान्वये (वारस इत्यादींस रीतसर मान्यता देण्याकरिता तरतूद करणारा विनियम) किंवा अमलात असलेल्या इतर विधीन्वये तिची व्यवस्था करण्यात येण्याच्या दृष्टीने जिल्हा न्यायाधीशास कळवील.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ८४ याच्या कलम २७ अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.