महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८३ :
चारशे रुपयाहून कमी किंमतीची विनामृत्युपत्र मालमत्ता :
१) १.(आयुक्ताच्या प्रभाराखालील कोणत्याही क्षेत्रात) जर कलम ८२ मध्ये उल्लेख केलेल्या स्वरुपाची कोणतीही मालमत्ता मृत्युपत्र न करता मरण पावलेल्या व्यक्तीने मागे ठेवलेली असून ती चारशे रुपयाहून कमी किंमतीची नाही असे आढळून आले तर, आयुक्त महाप्रशासक अधिनियम, १९१३ याच्या किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर विधींच्या उपबंधान्वये तिची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महाप्रशासक यास कळवील.
२) २.(आयुक्ताच्या प्रभाराबाहेरील क्षेत्रात) मालमत्ता ज्या नगरात किंवा गावात ती आढळून आली असेल त्या नगराच्या किंवा गावाच्या, पोलीस पाटलाच्या, कोणताही असल्यास, स्वाधीन करण्यात येईल आणि त्याबद्दल पोलीस पाटलाकडून पावती घेण्यात येईल आणि पोलीस पाटील, ज्या दंडाधिकाऱ्यास तो अधीन असेल त्या दंडाधिकाऱ्याकडे अशी मालमत्ता पाठवील. जर अशा कोणत्याही बाबतीत अशा नगराचा किंवा गावाचा पोलीस पाटील नसेल तर, पोलीस त्या जिल्ह्याचा दंडाधिकारी या बाबतीत वेळोवेळी नेमील अशा दंडाधिकाऱ्याकडे ताबडतोब प्रतिवृत्त पाठवतील आणि त्यानंतर प्रथम विनिर्दिष्ट केलेला उक्त दंडाधिकारी निदेश देईल त्यानुसार वागतील.
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईबाहेरील प्रदेशात या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.