Bp act कलम ८२ : हक्क न सांगितलेली मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८२ :
हक्क न सांगितलेली मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेणे :
१) पोलीस
अ) त्यांना सापडलेल्या किंवा त्याच्या स्वाधीन केलेल्या दावा न सांगितलेल्या सर्व मालमत्तेचा व त्याचप्रमाणे,
ब) जी कोणतीही मालमत्ता सार्वजनिक रस्त्यावर असेलीली आढळून येईल ती मालमत्ता काढून नेण्याविषयी तिच्या
मालकास किंवा ती स्वाधीन असलेल्या व्यक्तीस निदेश देण्यात आला असताही, ती ती मालमत्ता काढून नेण्याचे नाकारील किंवा तसे करण्यास चुकेल तर सर्व मालमत्तेचा तात्पुरता प्रभार घेईल.
२) १.(ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आली आहे अशा कोणत्याही क्षेत्रात) ज्या मालमत्तेचा पोलिसांनी पोट-कलम (१) अन्वये प्रभार घेतला असेल ती मालमत्ता आयुक्ताच्या हवाली करण्यात येईल.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply