महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८१ :
ताकीद मानण्याचे किंवा पोलिसांबरोबर जाण्याचे नाकारणे :
जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी या अधिनियमान्वये किंवा त्या अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमान्वये शिक्षेस पात्र असा आणि ज्याबद्दल इतरत्र किंवा त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही इतर विधिअन्वये कोणतीही स्पष्ट तरतूद केली नसेल असा असंज्ञेय अपराध करील ती व्यक्ती जर
१) पोलीस अधिकाऱ्याकडून ताकिद मिळाल्यानंतर असा अपराध करण्याचे चालू ठेवील, किंवा
२) आपल्याबरोबर पोलीस ठाण्यावर येण्यास सांगितले असता त्याच्या बरोबर तेथे जाण्याचे नाकारील, तर त्या पोलीस अधिकाऱ्यास तीस अधिपत्राशिवाय अटक करता येईल.