महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८० :
अटक करण्यासंबंधीचे इतर अधिकार :
१) सक्षम प्राधिकाऱ्याने या बाबतीत विशेषरीत्या कामावर लावलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, कलम ११० विनिर्दिष्ट केलेल्या एखाद्या अपराधाबद्दल अधिपत्राशिवाय अटक करता येईल.
२) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, कोणत्याही राहत्या घराचा, खाजगी जागेचा किंवा त्याला किंवा तिला जोडून असलेल्या कोणत्याही जमिनीचा किंवा जागेचा ताबाब किंवा प्रभार असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या माहितीवरुन त्या घरात किंवा घरावर, जागेत किंवा जागेवर, जमिनीत किंवा जमिनीवर कलम १२० अन्वये शिक्षापात्र अपराध केल्याचा जिच्यावर आरोप करण्यात आला आहे अशा व्यक्तीस अधिपत्राशिवाय अटक करता येईल.