Bp act कलम ८अ: १.(बिनतारी (वायरलेस) संदेश यंत्रणा व मोटार परिवहन यंत्रणा यासाठी किंवा कोणतेही विशिष्ट कर्तव्य पार पाडण्यासाठी २.(संचालक, पोलीस बिनतारी संदेश, याची व अधीक्षकाची), सहाय्यक अधीक्षकाची आणि उपअधीक्षकांची २.(नेमणूक) :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८अ :
१.(बिनतारी (वायरलेस) संदेश यंत्रणा व मोटार परिवहन यंत्रणा यासाठी किंवा कोणतेही विशिष्ट कर्तव्य पार पाडण्यासाठी २.(संचालक, पोलीस बिनतारी संदेश, याची व अधीक्षकाची), सहाय्यक अधीक्षकाची आणि उपअधीक्षकांची २.(नेमणूक) :
१) राज्य शासनास संपूर्ण राज्याकरिता अथवा त्याच्या कोणत्याही भागाकरिता –
अ)पोलीस बिनतारी संदेश यंत्रणेसाठी;
ब)पोलीस मोटार परिवहन यंत्रणेसाठी; किंवा
क)याबाबतीत राज्यशासन वेळोवेळी ठरवील
अशी विशिष्ट कर्तव्ये पार पाडण्यासाठी
३.((एक) पोलीस बिनतारीसंदेश यंत्रणेसाठी, त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे एका किंवा अनेक पोलीस बिनतारी संदेश यंत्रणा संचालकांची व ४.(विशेष पोलीस महानिरीक्षकांची) (ज्यांचा यापुढे संचालक, पोलीस बिनतारी संदेश यंत्रणा असा निर्देश केला आहे) आणि
(दोन) त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे, एक किंवा अधिक पोलीस अधीक्षकांची आणि सहायक पोलीस अधीक्षकांची व पोलीस उपअधीक्षकांची, नेमणूक करता येईल.)
२) अशी रीतीने नेमलेला ५.(कोणताही संचालक, बिनतारी संदेश यंत्रणा आणि पोलीस अधीक्षक) राज्य शासन ६.(त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे वेळोवेळी नेमून देईल) त्या शक्तींचा वापर करील व ती कामे पार पाडील. ७.(संचालकास, राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीने, या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये त्यास प्रदान करण्यात आलेल्या शक्ती आणि कर्तव्ये यांपैकी कोणत्याही शक्ती आणि कर्तव्ये अधीक्षकाकडे किंवा एखाद्या सहाय्यक किंवा उप अधीक्षकाकडे सोपविता येतील आणि अधीक्षकास, तशाच प्रकारच्या पूर्वपरवानगीस अधीन राहून, अशा शक्ती व कर्तव्ये एखाद्या सहाय्यक किंवा उपअधीक्षकाकडे सोपविता येतील:
परंतु असे की ८.(संचालक, अधीक्षक) किंवा सहाय्यक अधीक्षक किंवा उप अधीक्षक हे, ९.(महासंचालक आणि महानिरीक्षकाच्या) नियंत्रणास अधीन राहून, पूर्वोक्त शक्तींचा वापर करतील आणि पूर्वोक्त कामे पार पाडतील).
——–
१. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम २२ मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ४ अन्वये अधीक्षकाची नेमणूक याऐवजी समाविष्ट केले.
३. सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ अन्वये मूळ मजकुराऐवजी हा मजकुर समाविष्ट करण्यात आले.
४. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ४ अन्वये उपमहानिरीक्षकाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ अन्वये कोणत्याही अधीक्षकाने या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ अन्वये त्याजकडे वेळोवेळी अभिहस्तांकित करील या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
७. सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
८. सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ अन्वये अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
९. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये महानिरीक्षकाच्या या मजकुराऐवजी १३ डिसेंबर १९८२ पासून समाविष्ट करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply