महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७९ :
१.(पोलिसांसमक्ष विशिष्ट अपराध केले जातील तेव्हा अटक करण्याचे अधिकार:
कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, त्याच्या समक्ष, कलम ११७ किंवा कलम १२५ किंवा कलम १३० किंवा कलम १३१ चा उप-खंड (१), (४) किंवा (५) किंवा कलम ३९ किंवा ४० अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केल्याच्या बाबतीत कलम १३५ खंड (१) अन्वये शिक्षापात्र असा कोणताही अपराध करील अशा कोणत्याही व्यक्तीस, दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय व अधिपत्राशिवाय, अटक करता येईल.)
———
१. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम ३, दुसरी अनुसूची अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.