महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७८ :
प्राण्याचे खोगीर किंवा ओझे काढण्याची पोलीस अधिकाऱ्याची शक्ती:
जेव्हा कोणत्याही कामावर किंवा ओझ्यास लावण्यात आलेला कोणताही प्राणी कोणतेही क्षत झाल्याच्या कारणामुळे अशी रीतीने कामावर लावला जाण्यास अयोग्य आहे असा कोणताही पोलीस अधिकाऱ्यास सद्भावनापूर्वक संशय येईल तेव्हा, त्यास असा प्राणी ताब्यात असणाऱ्या व्यक्तीस त्या प्राण्यास कोणतेही क्षत आहे किंवा काय याबद्दल आपली खात्री करुन घेण्याच्या कारणाकरिता त्याचे खोगीर किंवा ओझे काढण्यास भाग पाडता येईल किंवा जर अशी व्यक्ती तसे करण्याचे नाकारील तर त्यास स्वत: उक्त प्राण्याचे खोगीर किंवा ओझे काढता येईल किंवा काढण्याची व्यवस्था करता येईल.