महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७७ :
१.(सन १९६० चा कायदा क्रमांक ५९) च्या कायद्याप्रमाणे प्राण्यासंबंधी करावयाची कार्यवाही:
जेव्हा कलम ७४ अन्वये एखादा प्राणी दंडाधिकाऱ्यापुढे हजर करण्यात येण्यापूर्वी एखाद्या उपचारालयात किंवा कोणत्याही योग्य जागी अटाकवून ठेवण्यासाठी पाठविण्यात येईल असा पोलीस अधिकारी निदेश देईल किंवा कलम ७४ अन्वये एखादा प्राणी औषधोपचारासाठी व सांभाळासाठी एखाद्या उपचारालयात पाठविण्यात येईल व तेथे तो अटकावून ठेवण्यात येईल, असा दंडाधिकारी निदेश देईल तेव्हा उक्त अधिनियमाच्या २.(कलम ३५) चे उपबंध शक्य असेल तेथवर लागू होतील.
———
१. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ६ (ब) अन्वये १८९० चा अधिनियम ११ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आला.
२. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ५ अन्वये कलम ६ब ची पोटकलमे (२) आणि (३) या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.