Bp act कलम ७३ : वॉरंटाशिवाय पोलिसांचे अटकेचे अधिकार:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७३ :
वॉरंटाशिवाय पोलिसांचे अटकेचे अधिकार:
कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, १.(प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०, याच्या कलम ११, पोट-कलम(१) च्या खंड (क), (ख), (ग), (घ), (ङ), (च), (छ), (ज), (झ), (ञ),(ट) किंवा (ड)) अन्वये शिक्षेस पात्र असा कोणताही अपराध आपल्या समक्ष करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय आणि अधिपत्राशिवाय अटक करता येईल.
——–
१. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम २ अन्वये प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १८९० याची कलमे ३, ३अ, ४, ५, ६ किंवा ६क याअन्वये किंवा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम याच्या कलम ३, ४, ५ किंवा ५अ अन्वये या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply