महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७२ :
पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करतात :
कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, दंडाधिकाऱ्याच्या कोणत्याही आदेशाशिवाय आणि अधिपत्राशिवाय,
१) कलम १२१ अन्वये शिक्षेस पात्र अशा एखाद्या अपराधाशी संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा अशा अपराधाशी संबंध असल्याबद्दल जिच्याविरुद्ध वाजवी तक्रार करण्यात आली असेल किंवा विश्वासार्ह माहिती मिळाली असेल किंवा वाजवी शंका असेल अशा कोणत्याही व्यक्तीस;
२) जी कोणतीही व्यक्ती कलम ३३ चे पोट-कलम (१) चा खंड (क्ष) अन्वये केलेल्या नियमांचे किंवा आदेशांचे किंवा ३६,३७,५६, १.(५७, ५७अ किंवा ६३अअ) या अन्वयेच्या आदेशांचे किंवा उल्लंघन करील अशा कोणत्याही व्यक्तीस;
२.(२अ) जी कोणतीही व्यक्ती कलम ६३अ च्या पोट-कलम (१) अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील अशा व्यक्तीस;)
३) जी कोणतीही व्यक्ती कलम १२२ किंवा १३६ अन्वये शिक्षापात्र अपराध करील अशा व्यक्तीस; अटक करता येईल.
———
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५७ किंवा ६३अअ अन्वये या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम ८ अन्वये खंड (२-क) समाविष्ट करण्यात आला.