Bp act कलम ७१ : कलम ४३,५५, ५६, १.(५७, ५७ अ किंवा ६३अअ) या अन्वये दिलेले आदेश अंमलात आणले आहेत, हे पाहणे हे पोलिसांचे कर्तव्य असेल :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७१ :
कलम ४३,५५, ५६, १.(५७, ५७ अ किंवा ६३अअ) या अन्वये दिलेले आदेश अंमलात आणले आहेत, हे पाहणे हे पोलिसांचे कर्तव्य असेल :
कोणत्याही प्राधिकाऱ्याने कलम ४३, ५५, ५६, १.(५७,५७अ किंवा ६३अअ) या अन्वये केलेला प्रत्येक विनियम आणि निदेश यांचे पालन योग्य रीतीने होते किंवा नाहीं ते पाहणे, जे लोक अज्ञानामुळे तो पाळण्यास चुकत असतील त्यांस ताकीद देणे आणि जी कोणतीही व्यक्ती जाणूनबुजून ता पाळणार नाही तीस अटक करणे ह पोलिसांचे कर्तव्य असेल.
——–
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५७ किंवा ६३अअ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply