महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७० :
कलम ३७, ३८, ३९ अन्वये दिलेले आदेश अमलात आणणे :
कलम ३७ अन्वये एखादी अभिसूचना योग्य रीतीने काढण्यात आली असेल किंवा कलम ३८ किंवा ३९ अन्वये एखादा आदेश काढण्यात आला असेल तेव्हा, जिल्ह्यातील कोणत्याही दंडाधिकाऱ्याने किंवा पोलीस अधिकाऱ्याने, अशा अधिसूचनेविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध वागणाऱ्या किंवा वागण्याच्या बेतात असलेल्या कोणत्याही व्यक्तीस पकडणे हे, विधिसंमत असेल. अशा दंडाधिकाऱ्यास किंवा पोलीस अधिकाऱ्यास, वर सांगितल्याप्रमाणे अशा अधिसूचनेचे किंवा आदेशाचे उल्लंघन करताना वापरलेली किंवा वापरली जाण्याच्या बेतात असलेली वस्तू किंवा जिन्नस जप्तसुद्धा करता येईल, आणि अशा जप्त केलेल्या जिनसेची विल्हेवाट त्या जागेची अधिकारिता असलेल्या कोणत्याही जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आदेशानुसार लावण्यात येईल.