Bp act कलम ६७ : पोलिसांनी रस्त्यावरील रहदारी वगैरेचे विनियमन करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६७ :
पोलिसांनी रस्त्यावरील रहदारी वगैरेचे विनियमन करणे:
खालील कामे करणे हे पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल:
अ) रस्त्यातील रहदारीचे नियमन करणे व रहदारीवर नियंत्रण ठेवणे, रस्त्यात अडथळे न येऊ देणे, आणि आपणास शक्य असेल तितका प्रयत्न करुन, रस्त्यात किंवा रस्त्याजवळ लोकांनी पाळण्यासाठी ह्या अधिनियमान्वये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमान्वये केलेला कोणताही नियम किंवा आदेश याच्या व्यतिक्रमणास प्रतिबंध करणे;
ब) रस्त्यात आणि स्नानाच्या, धुण्याच्या व उतरण्याच्या सार्वजनिक जागा, जत्रा, देवळे आणि सार्वजनिक संमेलनाच्या इतर सर्व जागा यांच्या ठिकाणी आणि सार्वजनिक पूजास्थानाच्या आसपास सार्वजनिक पूजेच्या वेळी बंदोबस्त करणे;
क) स्नानाच्या, धुण्याच्या आणि उतरण्याच्या सार्वजनिक जागी लोकांच्या येण्याजाण्याचे नियमन करणे, त्या जागी आणि सार्वजनिक तरीत फार गर्दी होऊ न देणे आणि आपणास शक्य असेल तितका प्रयत्न करुन अशा कोणत्याही जागी किंवा तरींवर लोकांनी पाळण्यासाठी म्हणून वैध रीत्या केलेला कोणताही नियम किंवा आदेश यांच्या व्यतिक्रमणास प्रतिबंध करणे.

Leave a Reply