Bp act कलम ६५ : सार्वजनिक जागी प्रवेश करण्याचे अधिकार:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६५ :
सार्वजनिक जागी प्रवेश करण्याचे अधिकार:
१) राज्यशासनाने किंवा वैधरीत्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने केलेले नियम आणि आदेश यांच्या अधीन राहून प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास, कलम ६४ मध्ये उल्लेख केलेल्या कारणांपैकी कोणत्याही कारणासाठी ज्या कोणत्याही सार्वजनिक स्थळाचा, दारुच्या गुत्त्याप्रमाणे किंवा मादक औषधी विकण्याच्या दुकानाप्रमाणे किंवा बेबंद किंवा गैरशिस्त लोकांच्या येण्याजाण्याच्या ठिकाणाप्रमाणे उपयोग होत असता, असे समजण्यास त्यास कारण असेल त्या जागत अधिपत्राशिवाय शिरुन ती तपासता येईल.
रस्त्यात आढळलेल्या संशयित व्यक्तीची झडती घेण्याचे अधिकार
२) जेव्हा रस्त्यात किंवा सार्वजनिक स्थळी कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात कोणतीही वस्तू असेल किंवा आहे असे दिसेल आणि जी चोरलेली मालमत्ता आहे असे कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास खरोखर वाटेल तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यास, झडती घेता येईल, तपासता येईल व विचारता येईल आणि ती मालमत्ता ताब्यात असलेल्या व्यक्तीने सांगितलेली हकीकत उघडपणे खोटी किंवा संशयास्पद असेल तेव्हा ती वस्तू अटकावून ठेवून घडलेली गोष्ट दंडाधिकाऱ्यास कळविता येईल आणि त्यानंतर दंडाधिकारी (फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८) च्या कलमे ५२३ व ५२५ अनुसार किंवा त्यावेळी अमलात असलेल्या इतर विधिनुसार काम चालवील.
———
१. आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २)

Leave a Reply