Bp act कलम ६३ : ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६३ :
ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी:
१) राज्य शासनास १.(किंवा या संबंधात राज्यशासनाने विशेषरीत्या शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास आदेश देऊन, जिच्या संबंधात कलम ५५, २.(५६, ५७ किंवा ५७ अ) अन्वये आदेश देण्यात आला असेल अशा कोणत्याही व्यक्तीस, यथास्थिती ३.(ज्या क्षेत्रातून किंवा क्षेत्रांतून) व त्यास जोडून असलेल्या कोणत्याही जिल्ह्यातून किंवा त्याच्या भागातून ४.(किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रांमधून) त्यास निघून जाण्याचा निदेश दिला असेल. ३.(त्या क्षेत्रात किंवा अशा क्षेत्रांमध्ये) व त्यास जोडून असलेल्या कोणत्याही जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात ४.(किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा क्षेत्रामध्ये) ते ५.(किंवा तो) सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा व अशी व्यक्ती मान्य करील अशा शर्तीस अधीन राहून तात्पुरत्या मुदतीकरिता प्रवेश करण्याची किंवा परत येण्याची परवानगी देता येईल आणि राज्य शासनास, किंवा या संबंधात राज्य शासनाने विशेषरीत्या शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास, अशी कोणतीही परवानगी कोणत्याही वेळी रद्द करता येईल.
२) ज्या ३.(क्षेत्रातून किंवा क्षेत्रांतून) व त्यालगत असलेल्या कोणत्याही जिल्ह्यातून किंवा त्याच्या भागातून ६.(किंवा विनिर्दिेट क्षेत्रातून किंवा क्षेत्रांमधून) निघून जाण्याबद्दल एखाद्या व्यक्तीस निदेश देण्यात आला असेल, ३.(त्या क्षेत्रात किंवा अशा क्षेत्रांमध्ये) व त्यास जोडून असलेल्या कोणत्याही जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात किंवा यथास्थिति, ६.(विनिर्दिेष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रांमध्ये) प्रवेश करण्याची किंवा परत येण्याची पोटकलम (१२) अन्वये परवानगी देताना राज्य शासनास ७.(किंवा अशा अधिकाऱ्यास), लादलेल्या शर्तीचे पालन करण्यासाठी जामीनदारासह किंवा जामीनदारावाचून बंधपत्र करुन देण्यास अशा व्यक्तीस फर्मावता येईल.
३) ज्या ३.(क्षेत्रातून किंवा क्षेत्रांतून) त्यास जोडून असलेल्या कोणत्याही जिल्ह्यातून किंवा त्याच्या भागातून ८.(किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रांमधून) तिला निघून जाण्याचा निदेश देण्यात आला होता, ३.(त्या क्षेत्रात किंवा अशा क्षेत्रांमध्ये) व त्यास जोडून असलेल्या कोणत्याही जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात किंवा यथास्थिति, ८.(विनिर्दिष्ट क्षेत्र किंवा क्षेत्रांमध्ये) प्रवेश करण्याची किंवा परत येण्याची पोट-कलम (१) अन्वये परवानगी मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीने यथास्थिती, उक्त आदेशात किंवा उक्त आदेश रद्द करणाऱ्या आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या वेळी व ठिकाणी व त्या विनिर्दिष्ट केलेल्या प्राधिकाऱ्याच्या स्वत: स्वाधीन झाले पाहिजे.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम २१ (१) (अ) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५६ किंवा ५७ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९५६ चा मुंबई अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ६ (अ) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
५. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम २१ (१) (ब) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
६. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ६ (ब) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
७. सन १९५९ चा मुबंई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम २१ (२) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
८. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ६ (क) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply