Bp act कलम ६३-अअ : १.(राज्य सरकारचे आणि विशेष शक्ती प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे हद्दपार करण्याचे अधिकार :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६३-अअ :
१.(राज्य सरकारचे आणि विशेष शक्ती प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे हद्दपार करण्याचे अधिकार :
१) राज्य शासनास किंवा राज्य शासनाने त्याबाबत विशेष रीतीने शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास, कलमे ५५, २.(५६, ५७ व ५७ अ) या अन्वये, ३.(ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आली असेल अशा कोणत्याही क्षेत्रात) आयुक्ताने व एखाद्या जिल्ह्यात त्याबाबत राज्य शासनाकडून ४.(***) अधिकार दिलेला जिल्हा दंडाधिकारी किंवा उप विभागीय दंडाधिकारी किंवा यथास्थिती, ५.(अधीक्षक) याने वापरावयाच्या अधिकारामध्ये राज्य शासनाने किंवा विशेष रीतीने शक्ती प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने यथास्थिती, अशा ६.(टोळीतील किंवा गटाती व्यक्तीला किंवा व्यक्तींना) ७.(किंवा भिकारी म्हणून घोषित करण्यात आलेल्या व्यक्तींना) कोणतेही स्थानिक क्षेत्र किंवा असे कोणतेही क्षेत्र किंवा कोणतेही जिल्हे किंवा त्यांचा भाग-मग तो त्यास जोडून असो अगर नसो – यांतून सोडून जाण्याबद्दल किंवा त्यात पुन्हा प्रवेश न करण्याबद्दल अथवा न परतण्याबद्दल कलम ८.(५५ व ५७अ अन्वये) निदेश देणे कायदेशीर असेल, असा फेरफार करुन, त्याच परिस्थितीत व त्याच रीतीने, वापर करता येईल.
२) ५८,५९,६०,६१,६२,६३ यांचे उपबंध, ज्याप्रमाणे ते कलम ५५, २.(५६, ५७ किंवा ५७अ) या अन्वयेच्या कोणत्याही शक्तींचा वापर करण्यास लागू होतात त्याप्रमाणे या कलमाखालील कोणत्याही शक्तींचा वापर करण्यास लागू होतील.)
——–
१. सन १९५६ चा मुंबई अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ८ अन्वये हे कलम समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५६ किंवा ५७ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९९५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ७ अन्वये विशेषरीत्या हा मजकुर वगळण्यात आलाव तो नेहमीकरिता वगळण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
५. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. सन १९६२ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ७ (ब) अन्वये अशा टोळीतील किंवा जमावातील व्यक्तीस किंवा व्यक्तींना किंवा बाहेरुन आलेल्या व्यक्तींना किंवा सिद्धापराध व्यक्तींना या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमाकं १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
८. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ७ (अ) अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply