Bp act कलम ६२ : एखादी व्यक्ती क्षेत्र सोडून न गेल्यास आणि काढून लावल्यानंतर तिने प्रवेश केल्यास करावयाच्या कार्यवाहीची पद्धती:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६२ :
एखादी व्यक्ती क्षेत्र सोडून न गेल्यास आणि काढून लावल्यानंतर तिने प्रवेश केल्यास करावयाच्या कार्यवाहीची पद्धती:
१.(१)) कलमे ५५, २.(५६, ५७ किंवा ५७ अ) अन्वये जिला ३.(कोणत्याही क्षेत्रातून, जिल्ह्यातून किंवा त्याच्या भागातून किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रातून) निघून जाण्याचा आदेश जिला देण्यात आला आहे अशी व्यक्ती-
(एक) निदेश दिल्याप्रमाणे निघून जाण्यात कसूर करील, किंवा
(दोन) अशा रीतीने निघून गेल्यानंतर, ४.(पोटकलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे) आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीखेरीज आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत, त्या ५.(क्षेत्रात, जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रात प्रवेश करील तर,)
संबंधित प्राधिकाऱ्यास तिला अटक करविता येईल व त्या ६.(क्षेत्राच्या, जिल्ह्याच्या किंवा त्याच्या भागाच्या बाहेर किंवा यथास्थिती विनिर्दिष्ट क्षेत्राच्या बाहेर,) उक्त प्राधिकरण प्रत्येक बाबतीत विहित करील अशा जागी पोलीस कोठडीत पाठविण्याची व्यवस्था करता येईल.
७.(२) कलम ५५, २.(५६, ५७ किंवा ५७ अ) अन्वये आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्यास, ज्या व्यक्तीबाबत अशा रीतीने आदेश देण्यात आला असे त्या व्यक्तीस ज्या क्षेत्रातून ८.(किंवां विनिर्दिष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रांतून) तसेच त्यालगत लागून असलेले जिल्हे व भाग यातून निघून जाण्याबाबत निदेश देण्यात आला होता, त्या क्षेत्रात व त्यालगत असलेल्या कोणत्याही जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात, अशा परवानगीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा तात्पुरत्या मुदतीसाठी व विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीस अधीन राहून प्रवेश करण्याची किंवा परत येण्याची परवानगी देता येईल, तसेच त्यास, लादण्यात आलेल्या शर्तीचे योग्य रीतीने पालन करण्यासाठी जमिनासह किंवा जामिनासह किंवा जामिनावाचून बंधपत्र लिहून देण्यात अशा व्यक्तीस भाग पाडता येईल. उक्त अधिकाऱ्यास कोणत्याही वेळी अशी कोणतीही परवानगी रद्द करता येईल. अशी परवानगी घेऊन ९.(त्या क्षेत्रात, जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात किंवा अशा विनिर्दिष्ट क्षेत्रात) प्रवेश करणारी किंवा परत येणारी कोणतीही व्यक्ती, लादलेल्या शर्तीचे पालन करील, आणि ज्या तात्पुरत्या मुदतीसाठी तिला प्रवेश करण्याची किंवा परत येण्याची परवानगी देण्यात आली होती ती मुदत संपल्यावर किंवा अशी परवानगी त्यापूर्वीच रद्द करण्यात आली असेल तर ती, अशा क्षेत्रातून, किंवा असे क्षेत्र आणि त्यास लागून असलेले कोणतेही जिल्हे किंवा त्यांचा भाग यातून १०.(किंवा अशा विनिर्दिष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रांतून) स्वत: होऊन निघून जाईल, आणि कलमे ५५, २.(५६, ५७ किंवा ५७अ) अन्वये दिलेल्या आदेशात जी मुदत विनिर्दिष्ट करण्यात आली असेल त्या मुदतीपैकी उरलेल्या मुदतीत, ती त्यात, पुन्हा परवानगी घेतल्याशिवाय, प्रवेश करणार नाही किंवा परत येणार नाही. जर अशी व्यक्ती लादलेल्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे पालन करण्यात किंवा त्यानुसार स्वत: होऊन निघून जाण्यात कसूर करील किंवा अशा रीतीने स्वत: होऊन निघून गेल्यावर, पुन्हा परवानगी घेतल्याशिवाय त्या क्षेत्रात त्यालगतच्या जिल्ह्यांत किंवा त्याच्या भागात ११.(किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये) प्रवेश करील किंवा परत येईल तर, संबंधित प्राधिकाऱ्यास, त्या व्यक्तीस अटक करता येईल व प्रत्येक बाबतीत संबंधित प्राधिकारी, विहित करील अशा १२.(क्षेत्रांबाहेरील व जिल्हयांबाहेरील किंवा त्याच्या भागाबाहेरील किंवा यथास्थिति, विनिर्दिष्ट क्षेत्राबाहेरील किंवा क्षेत्रांबाहेरील) ठिकाणी पोलीसांच्या अभिरक्षेत नेऊन ठेवता येईल.
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम ३७ याच्या कलम ३ अन्वये या कलमास पोट-कलम (१) असा नवीन क्रमांक देण्यात आला.
२. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५६ किंवा ५७ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ५ (अ) (एक) अन्वये क्षेत्र या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम ३ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
५. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ५ (अ) (दोन) अन्वये क्षेत्रात प्रवेश करील तर या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ५ (अ) (तीन) अन्वये मजकुर समाविष्ट करण्यात आले.
७. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम ३(२) अन्वये हे पोटकलम जादा समाविष्ट केले.
८. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ५ (ब) (एक) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
९. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ५ (ब) (दोन) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१०. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ५ (ब) (तीन) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
११. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ५ (ब) (चार) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१२. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ५ (ब) (पाच) अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply