महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६१ :
विवक्षित बाबतीत राज्य सरकारने दिलेल्या आदेशांची अंतिमता:
कलम ५५, १.(५६, ५७ किंवा ५७अ) या अन्वये काढलेल्या किंवा राज्य शासनाने कलम ६० अन्वये दिलेल्य कोणत्याही आदेशास, तो आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याने किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने कलम ५९, पोट-कलम(१) मध्ये उल्लेख केलेली कार्यरीती अनुसरली नव्हती किंवा जिच्या संबंधात कलम ५६ अन्वये आदेश देण्यात आला होता त्या व्यक्तीविरुद्ध उघडपणे साक्ष देण्यासाठी पुढे येण्यास साक्षीदार तयार नव्हते असे उक्त प्राधिकाऱ्याचे मत नव्हते ही कारणे खेरीज करुन कोणत्याही न्यायालयात हरकत घेता येणार नाही.
———
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियक क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५६ किंवा ५७ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.