महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ५८ :
कलमे ५५, १.(५६, ५७ व ५७ अ) याअन्वये दिलेल्या आदेशाच्या प्रवर्तनाचा कालावधी:
कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात २.(किंवा अशा क्षेत्रात आणि कोणत्याही जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांमध्ये किंवा त्याच्यालगतच्या कोणत्याही भागात ३.(किंवा, यथास्थिती, कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये)) प्रवेश न करण्याबाबतच्या कलमे ५५, १.(५६, ५७ किंवा ५७ अ) याअन्वये दिलेला निदेश, त्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा मुदतीसाठी असेल आणि कोणत्याही बाबतीत अशी मुदत, ४.(ती व्यक्ती ज्या तारखेस त्या क्षेत्रामधून, त्या जिल्ह्यातून किंवा उपरोक्त भागातून ५.(किंवा, यथास्थिती, कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा क्षेत्रांमधून) स्वत: निघून गेली असेल किंवा तिला घालविण्यात आले असेल, त्या तारखेपासून) दोन वर्षाच्या मुदतीपेक्षा अधिक असणार नाही.
——–
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियक क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५६ किंवा ५७ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५६ चा मुंबई अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ४ (अ) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९७० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ याच्या कलम ३ अन्वये तो ज्या तारखेस दिला असेल त्या तारखेपासून या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ४ (ब) अन्वये समाविष्ट करण्यात आले.