Bp act कलम ५५: व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
दोन : टोळ्यांची पांगापांग करणे आणि विवक्षित अपराधांसाठी शिक्षा झालेल्या व्यक्तिंना १.(व भिकाऱ्यांना) बाहेर घालवणे :
कलम ५५:
व्यक्तींच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणे:
आयुक्तास बृहन्मुंबईत व कलम (७) अन्वये ज्या क्षेत्रासाठी त्याची नेमणूक करण्यात आली असेल अशा इतर क्षेत्रात आणि त्याबाबत राज्य शासनाकडून २.(***) * शक्ती प्रदान करण्यात आलेला जिल्हा दंडाधिकारी, उप-विभागीय दंडाधिकारी किंवा ३.(अधीक्षक) यास, जिल्ह्यात व्यक्तींची कोणतीही टोळीच्या अगर गटाच्या आपल्या प्रभारातील क्षेत्रात फिरत असल्यामुळे किंवा तळ देऊन राहिल्यामुळे तेथे धोका उत्पन्न झाला आहे किंवा होण्याचा संभव आहे किंवा त्या टोळीचा किंवा जमावाचा किंवा जमावातील व्यक्तींचा बेकायदेशीर रीतीने वागण्याचा हेतू असल्याबद्दल भीती किंवा वाजवी संशय उत्पन्न झाला आहे किंवा होण्याचा संभव आहे असे दिसून येईल तेव्हा, त्या टोळीतल्या किंवा जमावातल्या व्यक्तींनी हिंसा व भय यांस प्रतिबंध होण्यास जसे वागणे आवश्यक असेल तसे वागण्याबद्दल किंवा त्या टोळीची किंवा त्या जमावाची पांगापांग करुन त्यातील प्रत्येक व्यक्तीने अशा अधिकाऱ्याच्या अधिकारितेतील स्थानिक हद्दीच्या क्षेत्राबाहेर ४.(किंवा त्याच्याशी लगतचा असलेल्या अशा क्षेत्रात आणि कोणत्याही जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांत किंवा त्याच्या कोणत्याही भागाबाहेर) निघून जाण्याबद्दल किंवा तो विहित करील अशा वेळात जाण्याबद्दल व त्या प्रत्येकास ज्या क्षेत्राच्या किंवा जागेच्या बाहेर निघून जाण्याचा निदेश देण्यात आला असेल त्या क्षेत्रात ४.(किंवा, यथास्थिति, त्यालगत असलेले कोणतेही क्षेत्र किंवा जिल्हा किंवा जिल्हे किंवा यथास्थिती, त्यांचा कोणताही भाग) यात पुन्हा न जाण्याबद्दल किंवा त्या त्या जागेत पुन्हा न परतण्याबद्दल त्या टोळीचे किंवा जमावाचे जे पुढारी किंवा प्रमुख म्हणून दिसत असतील त्यांच्या नावाने अधिसूचना काढून व ती अधिसूचना दवंडी पिटवून किंवा त्यास योग्य वाटेल त्या इतर रीतीने प्रसिद्ध करुन आदेश देता येईल.
——–
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९९५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ३ अन्वये विशेषरीत्या हा मजकूर वगळण्यात आला व तो नेहमीकरीता वगळण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
*. सन १९९५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ३ अन्वये वगळेला विशेषरीत्या हा शब्द असताना काढलेल्या सर्व अधिसुचना, आदेश इ. विशेषरीत्या या शब्दांच्या सुधारणेनंतरही अंमलात राहतील मात्र त्यातला विशेषरीत्या हा शब्द वगळण्यात येईल.
३. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आला.
४. सन १९५६ चा मुंबई अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply