Bp act कलम ५४ : जादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रमाणशीर वसुली करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ५४ :
जादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रमाणशीर वसुली करणे:
१) मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण अधिनियम १९४७ १.(किंवा २.(महाराष्ट्र राज्याच्या ) कोणत्याही प्रदेशात अमलात असलेला कोणताही तत्सम विधी) यांत काहीही असले तरी कलम ५० किंवा ५१ च्या उपबंधाअन्वये महानगरपालिका आयुक्ताला, नगरपालिकेला किंवा यथास्थिती जिल्हाधिकाऱ्याला जेव्हा कलम ५० पोट-कलम (३) मध्ये उल्लेख केलेली जादा रक्कम (जिला यात यापुढे जादा खर्च असे म्हटले आहे) धरुन किंवा भरपाईची रक्कम व नगरपालिकेचा वसुली खर्च (ज्यास यापुढे दंग्याबाबत कर असे म्हटले आहे) धरुन जादा पोलिसांचा खर्च सामान्य किंवा मालमत्तेवरील करांत वाढ करुन वसून करावा लागेल तेव्हा, ज्याच्याकडून कोणत्याही जागेच्या संबंधात जादा खर्च किंवा दंग्याबाबत कर यांचा कोणताही भाग वसूल करण्यात आला असेल अशा त्या जागेच्या मालकास, अशा भागांपैकी ७५ टक्के रक्कम, कलम ५० पोट-कलम (१) अन्वये ठरविलेल्या मुदतीत किंवा यथास्थिती कलम ५१, पोट-कलम (१), खंड (ब) अन्वये विनिर्दिष्ट केलेल्या तारखेस किंवा विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत बऱ्याच काळपर्यंत त्या जागेचा भोगवटा करीत असलेल्या भाडेकऱ्याकडून पोट-कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने वसूल करण्याचा हक्क असेल.
२) पोट-कलम (१) चे उपबंध भाडेकऱ्याकडून दंग्याबाबत कराची रक्कम वसूल करण्याशी त्याचा जेथवर संबंध असेल तेथवर मुंबई भाडे नियंत्रण आणि हॉटेल व निवासगृह दर नियंत्रण अधिनियम, १९४७, याचे कलम १० ब हे बृहन्मुंबईत जेवढ्या मुदतीत अमलात असेल तेवढ्या मुदतीपुरते बृहन्मुंबईस लागू असणार नाहीत.
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १८ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० या अन्वये मुंबई राज्याच्या या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply