Bp act कलम ४: पोलीस दलावरील देखरेखीचे काम राज्य सरकारकडे असणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ४:
पोलीस दलावरील देखरेखीचे काम राज्य सरकारकडे असणे:
संपूर्ण १.( २.(महाराष्ट्र राज्यातील)) पोलीस दलावरील देखरेख करण्याचे काम राज्य शासनाकडे निहीत असते आणि ते राज्यशासनाने करावयाचे असते. आणि ३.(अशा अधीक्षणास (देखरेख) अधीन राहून गृहखात्याचे सचिव मग त्यांचा दर्जा सचिव, गृहसचिव, विशेष सचिव, अपर मुख्य सचिव अगर इतर नावाने असो. आणि ते गृहखात्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे प्रमुख असतात. हे पोलीस दलावर नियंत्रण ठेवण्याचे निदेश देण्याचें अगर देखरेख ठेवण्याचे काम करतील.)
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ७ अन्वये राज्यातील या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये मुंबई राज्यासाठी या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४ अन्वये आणि कोणत्याही अधिकाऱ्यास या मजकुराने सुरु होणाऱ्या व अधीन राहून गेले पाहिजे या मजकुराने संपणाऱ्या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply