Bp act कलम ४९ : कलम ४७-४८ अन्वये जादा पोलिसांचा खर्च वसूल करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ४९ :
कलम ४७-४८ अन्वये जादा पोलिसांचा खर्च वसूल करणे:
कलम ४७ किंवा ४८ खाली कोणताही वाद उपस्थित झाल्यास बृहन्मुंबईत मुख्य इलाखा शहर दंडाधिकारी व जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी यांचा, रक्कम किती द्यावयाची व कोणी द्यावयाची याबाबतचा निकाल निर्णायक असेल आणि याप्रमाणे ठरविलेली रक्कम ही, मुख्य इलाखा शहर दंडाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांनी मागणी केली असता, ती देण्याबद्दल जी व्यक्ती जबाबदार असल्याचे आढळून आले असेल तिने देणे असलेली जमीनमहसुलाची थकबाकी आहे असे समजून जिल्हाधिकारी ती वसूल करील.

Leave a Reply