Bp act कलम ४६ : १.(अधीक्षकाने) जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आणि आयुक्ताच्या नियंत्रणास अधीन राहून य जिल्हा दंडाधिकाऱ्यानी राज्यशासनाच्या नियंत्रणास अधीन राहून या प्रकरणाखालील अधिकारांचा वापर करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ४६ :
१.(अधीक्षकाने) जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आणि आयुक्ताच्या नियंत्रणास अधीन राहून य जिल्हा दंडाधिकाऱ्यानी राज्यशासनाच्या नियंत्रणास अधीन राहून या प्रकरणाखालील अधिकारांचा वापर करणे :
या प्रकरणान्वये प्रदान केलेल्या ज्या अधिकाराचा वापर करण्याचा अधिकार राज्य शासनाकडून ज्याला विशेषरीत्या प्रदान करण्यात आलेल्या नाहीत अशा एखाद्या १.(अधीक्षकाला) किंवा त्याच्या हाताखालील कोणत्याही अधिकाऱ्याला या प्रकरणान्वये प्रदान केलेल्या प्रत्येक शक्तीचा वापर त्याच्याकडून जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आदेशास अधीन राहून करण्यात येईल आणि या प्रकरणान्वये केलेले सर्व नियम, विनियम व आदेश हे २.(महसूल आयुक्ताने किंवा आयुक्ताने) केले असतील तर, त्यांना, राज्य शासन याबाबतीत वेळोवेळी करील असे नियम व आदेश लागू होतील व जिल्हा दंडाधिकाऱ्याने किंवा त्या बाबतीत विशेषरीत्या शक्ती प्रदान केलेल्या १.(अधीक्षकाने) ते केले असतील तर ते कलम १७ च्या उपबंधास अधीन असतील.
———
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९६० चा महाराष्ट्र अधिनियक क्रमांक २ याच्या कलम ४ अन्वये आयुक्ताने या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply