महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
प्रकरण २ :
पोलीस दलाचे अधीक्षण (देखरेख) नियंत्रण आणि संघटन :
कलम ३:
१.(संपुर्ण २.(महाराष्ट्र राज्यासाठी) एक पोलीस दल असेल) :
१.(संपूर्ण २.(महाराष्ट्र राज्यासाठी)) एक पोलीस दल असेल ३.(आणि अशा पोलीस दलामध्ये कलम २ च्या खंड (६) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असेल) :
परंतु, असे की, हा अधिनियम ४.(राज्याच्या संबंधित भागात) अमलात येण्याच्या निकटपूर्वी अनुसूची एक मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमान्वये, रचना करण्यात आलेल्या पोलीस दलातील व्यक्ती ह्या, उक्त दलातील व्यक्ती आहेत असे मानण्यात येईल.
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ६ अन्वये संबंध राज्यासाठी या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये मुंबई राज्यासाठी या मजकुराऐवजी सामविष्ट करण्यात आले.
३. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.