Bp act कलम ३१: पोलीस अधिकाऱ्यांना पुरविलेली जागा त्यांनी ताब्यात ठेवणे आणि ती रिकामी करुन देण्याचे दायित्व :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ३१:
पोलीस अधिकाऱ्यांना पुरविलेली जागा त्यांनी ताब्यात ठेवणे आणि ती रिकामी करुन देण्याचे दायित्व :
१) पोलीस अधिकाऱ्यास राहण्यासाठी राज्य शासनाने पुरविलेली कोणतीही जागा ताब्यात ठेवणारा पोलीस अधिकारी,
अ) राज्य शासन सर्वसाधारणपणे किंवा विशेष बाबतीत विनिर्दिष्ट करील अशा शर्तीनुसार व अटीनुसार ती ताब्यात ठेवील; आणि
ब) त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधीत काहीही अंतर्भूत असले तरी तो पोलीस अधिकारी म्हणून असण्याचे बंद झाल्यावर किंवा ज्या ज्या वेळी राज्य शासनास किंवा राज्य शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास ती जागा खाली करुन देण्यास भाग पाडणे आवश्यक व इष्ट वाटेल त्या त्या वेळी ती रिकामी करुन देईल.
२) पोटकलम (१) अन्वये कोणतीही जागा खाली करुन देण्यास बांधलेली किंवा भाग पाडण्यात आलेली कोणतीही व्यक्ती तसे करण्यात कसूर करील तर, राज्य शासनास किंवा राज्य शासनाने या संबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास, अशा व्यक्तीस जागा खाली करुन देण्याविषयी आदेश देता येईल आणि त्यास, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, आवश्यक असेल अशी मदत घेऊन, उक्त जागेत प्रवेश करण्याविषयी आणि तीत आढळून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस तेथून बाहेर काढून लावण्याविषयी आणि उक्त जागेचा कब्जा घेऊन ती निदेशात विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या स्वाधीन करण्याविषयी निदेश देता येईल.

Leave a Reply