Bp act कलम २८: पोलिस अधिकारी हे, नेहमी कामावर आहेत असे समजणे आणि ते राज्याच्या कोणत्याही भागात कामावर पाठविले जाण्यास पात्र असणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २८:
पोलिस अधिकारी हे, नेहमी कामावर आहेत असे समजणे आणि ते राज्याच्या कोणत्याही भागात कामावर पाठविले जाण्यास पात्र असणे :
१) रजेवर नसलेला किंवा ज्यास निलंबित केले नसेल असा प्रत्येक पोलीस अधिकारी हा नेहमी कामावर आहे असे या अधिनियमाच्या सर्व प्रयोजनांसाठी समजण्यात येईल आणि राज्याच्या एका भागात काम करण्यासाठी नेमून दिलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास किंवा कोणत्याही संख्येइतक्या अशा पोलीस अधिकाऱ्यांना किंवा अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या गटास राज्य शासन किंवा १.(महासंचालक व महानिरीक्षक) तसा निदेश देईल तर, राज्याच्या कोणत्याही इतर भागात जोपर्यंत त्यांची सेवा आवश्यक असेल तोपर्यंत त्या भागात कोणत्याही वेळी पोलिसाच्या कामावर ठेवता येईल.
प्रत्यावित बदल्यांसंबधी १.(महासंचालक व महानिरीक्षक याने) आयुक्तास व जिल्हा दंडाधिकाऱ्यास कळविणे :
२) अत्यंत निकडीचे प्रसंग खेरीजकरुन इतर प्रसंगी, या कलमान्वये जी कोणतीही बदली करण्याचे योजिले असेल त्याविषयी १.(महासंचालक व महानिरीक्षक) २.(महसूल आयुक्ताला) व जिल्हा दंडाधिकाऱ्याला सूचना देईल आणि गुप्तता राखण्याची आवश्यकता असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, अशा बदलीच्या कारणांचा खुलासा करील आणि मग उक्त अधिकारी व त्यांच्या हाताखालील व्यक्ती अशी बदलीबाबतची पुढील सर्व वाजवी कार्यवाही करतील.
———
१. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये १३ डिसेंबर १९८२ पासून हा मजकूर समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ८ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये कमीशनरास या मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply