महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २४:
१.(महासंचालक व महानिरीक्षक यांस) किंवा आयुक्त यास विवरणे मागविता येतील :
१) राज्य शासनाच्या नियमांस व आदेशांस अधीन राहून, १.(महासंचालकास व महानिरीक्षकास) आपल्या हाताखालील व्यक्तींना गुन्ह्याचा बंदोबस्त करणे, सुव्यवस्था राखणे व त्यांची कर्तव्ये बजावणे या गोष्टींशी संबंध असलेल्या विषयांबद्दल पाठविता येतील अशी विवरणे, प्रतिवृत्ते व विवरणपत्रे त्यांजकडून मागविता येतील १.(महासंचालक व महानिरीक्षक), उक्त कारणांसाठी अगर त्यास शासन विनिर्दिष्ट करील असे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यास २.( व महसूल आयुक्तास ) कळवील.
२) आयुक्तास, उपरिनिर्दिष्ट गोष्टीस अधीन राहून, त्याच्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्राच्या संबंधात, पोटकलम(१) मध्ये तरतूद करण्यात आलेली विवरणे, प्रतिवृत्ते व विवरणपत्रे मागविता येतील.
——–
१. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये १३ डिसेंबर १९८२ पासून हा मजकूर समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
२. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ८ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.