Bp act कलम २३: पोलिसांच्या प्रशानासाठी नियम तयार करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
प्रकरण ३ :
पोलीस दलाचे विनियमन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व त्याच्यात शिस्त राखणे :
कलम २३:
पोलिसांच्या प्रशानासाठी नियम तयार करणे:
राज्य शासनाच्या आदेशास आधीन राहून, आयुक्तास बृहन्मुंबईसाठी व त्यास ज्या क्षेत्राकरिता नेमण्यात आलेले असेल अशा इतर क्षेत्रांसाठी नेमून देण्यात आलेल्या पोलीस बलाच्या बाबतीत आणि १.(महासंचालक व महानिरीक्षकाला) इतर क्षेत्रांसाठी नेमून देण्यात आलेल्या पोलीस बलाच्या बाबतीत, पुढील गोष्टींसाठी या अधिनियमाशी किंवा त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही इतर अधिनियमितीशी विसंगत नसतील असे नियम करता येतील किंवा आदेश देता येतील:
अ) त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी करावयाच्या, पोलीस दलाच्या तपासणीचे विनियमन करणे;
ब) पोलिसंना शस्त्रे, साजसरंजाम, कपडे व इतर आवश्यक गोष्टी कोणत्या प्रकारच्या व किती द्यावयाच्या हे ठरविणे.
क) पोलीस दलातील व्यक्तींच्या राहण्याच्या जागा विहित करणे:
ड) पोलीस दलाच्या प्रशासनासंबंधीच्या कोणत्याही कार्यासाठी कोणताही पोलीस निधी स्थापन करणे, त्याची व्यवस्था पाहणे व त्याचे विनियमन करणे.
ई) कलम १७ च्या उपबंधास अधीन राहून, पोलिसंची वाटणी, त्यांचे स्थानांतरण व त्याचे ठिकाण यांचे विनियमन करणे.
फ) सर्व दर्जाच्या व श्रेणींच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे कर्तव्ये नेमून देणे आणि
१) ज्या रीतीने, आणि
२) ज्या शर्तीनुसार ते आपापल्या शक्तींचा वापर करतील व कर्तव्ये पार पाडतील ती रीत व त्या शर्ती विहित करणे;
ग) पोलिसांनी बातमी व माहिती मिळविणे व ती कळविणे यांचे विनियमन करणे;
ह) सामान्यत: पोलिसांना आपली कर्तव्ये बजावण्याच्या बाबतीत कार्यक्षम करणे व त्यांनी कर्तव्याचा दुरुपयोग करण्यास अगर ती बजाविण्यात हयगय करण्यास प्रतिबंध करणे.
——–
१. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये १३ डिसेंबर १९८२ पासून हा मजकूर समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply