Bp act कलम २२ न-१ : १.(वर्षातील बदल्यांची कमाल टक्केवारी :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ न-१ :
१.(वर्षातील बदल्यांची कमाल टक्केवारी :
कलम २२ न च्या पोट-कलम (१) मध्ये किंवा या अधिनियमाच्या इतर कोणत्याही तरतुदींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही एकाच विभागामधून किंवा कार्यालयामधून पोलीस कर्मचारीवर्गाच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्यामुळे, शासकीय कामकाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी, कोणत्याही कार्यालयामधून किंवा विभागामधून एका वर्षात एकावेळी एक-तृतीयांशापेक्षा अधिक कर्मचारीवर्गाची बदली करता येणार नाही.
——-
१. सन २०१५ चा अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply